30 वर्षानंतर अमिताभ-शबाना एकत्रित 

बॉलीवूडमधील महानायक, बीग बी अमिताभ बच्चन आणि आपल्या सदाबहार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शबाना आझमी ही जोडी तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्रित येणार आहे. दिग्दर्शक अनुराग बसु हे आपल्या आगामी मल्टीस्टार चित्रपटासाठी दोघांना कास्ट करणार आहेत.

अमिताभ आणि शबानाची जोडी सुमारे 30 वर्षानंतर एका चित्रपटात काम करणार आहेत. यापूर्वी ही जोडी 1989मध्ये प्रदर्शित झालेल्या “मै आझाद हू’ या चित्रटात दिसली होती. तसेच 2007 मध्ये शाहरूख खानच्या “ओम शांती ओम’मध्ये दोघांनी पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनुराग बसु यांनी आपल्या या मल्टीस्टार चित्रपटात अमिताभ-शबाना यांच्याशिवाय सैफ अली खान, आदित्य रॉय कपूर आणि तापसी पन्नू आदी कलाकार निश्‍चित केले आहे. “बाजार’ चित्रपटासाठी दिलेल्या मुलाखतीत सैफने अनुराग बसु यांच्या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले होते. बसु यांचा चित्रपट हा चार वेगवेगळया जोडप्यांवर आधारित असल्याचे समजते.

या चार जोडप्यांपैकी पहिले जोडपे हे अमिताभ-शबाना यांची आहे. दुसरी जोडी आदित्य रॉय कपूर-तापसी पन्नू, तर तिसरी जोडी सैफसोबत असणार आहे. मात्र, चौथी जोडी अद्याप निश्‍चित झाली नाही. अनुराग यांचा हा चित्रपट 2007मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या “लाइफ इन ए मेट्रो’चा पुढील भाग आहे. पण याबाबत अनुराग यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)