मोदींना हवेत 3 लाख 60 हजार कोटी : राहुल गांधी

नवी दिल्ली – मोदींनी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जे घोळ घालणारे निर्णय घेतले आहेत त्यातून झालेली दुर्दशा दूर करण्यासाठीच त्यांना रिझर्व्ह बॅंकेकडून 3 लाख 60 हजार कोटी रूपयांचा निधी हवा आहे. पण रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी खमकेपणाने मोदींच्या विरोधात उभे ठाकावे आणि देशाचे रक्षण करावे असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

रिझर्व्ह बॅंकेकडे सध्या 9 लाख 59 हजार कोटी रूपयांची राखीव गंगाजळी आहे त्यातील एक तृतीयांशापेक्षा जास्त निधी सरकारला मिळावा यासाठी केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेवर दबाव आणत आहे अशा बातम्या काही ठिकाणी छापून आल्या आहेत. त्या वृत्ताचा दाखला देत राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर ही टीका केली आहे. केंद्र सरकारकडून पैशासाठी दबाव आला तरी उर्जित पटेल यांनी त्यांच्या दबावापुढे न झुकता देशाचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी पटेल यांना केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी सरकार देशातील संस्थात्मक चौकट मोडीत काढीत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी यानिमीत्त पुन्हा एकदा केला. आपल्या मनमानीसाठी केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेवर दबाव आणत आहे असे त्यांनी म्हटले आहे. या बॅंकेची स्वायत्तता जपली गेली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)