कोल्हापूरातील अपघातात 3 ठार 

कोल्हापूर – आजरा-चंदगड मार्गावरील शृंगारवाडी फाट्याजवळील वळणावर दुचाकी आणि ट्रकच्या धडकेत तीन जण जागीच ठार झाले आहेत. राजेंद्र ऊर्फ आप्पा रमेश रेडेकर (वय 26), बायाक्‍का राजाराम पाटील (60) व ऋतुजा मिलिंद पाटील (18, सर्व रा. वाघराळी, ता. गडहिंग्लज) अशी मृत्यांची नावे आहेत. अपघाताचे वृत्त समजताच वाघराळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.

राजेंद्र रेडेकर हे बायाक्‍का व ऋतुजा या घेवून नेसरीहून भावेवाडीच्या (ता. आजरा) दिशेने दुचाकीवरून जात होते. दरम्यान, शृंगारवाडी फाट्याजवळील आजऱ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला मोटारसायकलची जोरदार धडक बसली. त्यात तिघेही जागीच ठार झाले. राजेंद्र हे एका खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करीत होते. त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच, वडील रमेश रेडेकर यांच्यासह आई व बहिणीने टाहो फोडला.

-Ads-

बायाक्‍का यांच्या पश्‍चात पती राजाराम पाटील असून, त्यांची दोन मुले मुंबईला व एक मुलगा सैन्यात आहे. ऋतुजा ही गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात बारावीत शिकत होती. याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र शिवाजीराव निंबाळकर (42, रा. उचंगी) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)