वडोदरा येथील रिलायन्स प्लांटला आग-3 ठार , 8 जखमी

वडोदरा (गुजरात): वडोदरा येथील रिलायन्सच्या प्लांटला लागलेल्या आगीत 3 मजूर मरण पावले असून 8 मजूर जखमी झाले आहेत. जखमीं मजुरांना वडोदऱ्याच्या एसजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी चार जणांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 3.30 वाजता धनेरी-कोयली येथील रिलायन्स आयसीपीआरच्या पीबीआर-2 प्लांटला अचानक आग लागली. या आगीत सापडलेले महेंद्रभाई जाधव, अरुणभाई डाभी आणि प्रीतीश पटेल हे तीन मजूर जागेवरच मरण पावले. आगीची माहिती मिळताच त्वरित अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. आगीत अडकलेल्या 8 मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना 5 तास प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

-Ads-

फिनिशिंग फॉगिंगचे काम चालू असताना ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यांना घालवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
11 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)