2,900 रुपयांपेक्षा स्वस्त साखर विकणारे कारखाने गोत्यात

File Photo

चौकशी करून कडक कारवाई करण्याचे अन्न व पुरवठा नागरी मंत्रालयाला आदेश

पुणे – केंद्र सरकारने साखरेचा किमान हमिभाव 2,900 रुपये केलेला असून जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या कारखान्यांची चौकशी करून कडक कारवाई करा, असा आदेश केंद्रीय अन्न व पुरवठा नागरी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) रामविलास पासवान यांनी दिल्लीमध्ये दिले.

महाराष्ट्रातील साखर कारखाने केंद्राने ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी दराने साखर विकत असल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज पासवान यांची भेट घेऊन केली. त्यावेळी पासवान यांनी संबंधित मंत्रालयाचे सचिव रविकांत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

राज्यात काही साखर कारखाने 2,900 रुपयांपेक्षा कमी दराने साखर विकत आहे. सरकारने कायदा केला असला, तरीही कमी दर्जाची साखर दाखवून सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या होलसेल दरामध्ये घट होत आहे. अशामुळे ज्या कारखान्यांची “एफआरपी’ जास्त आहे, अर्थात त्यांना 2,900 ते 3,000 रुपयांची पहिली उचल द्यावी लागते. त्यामुळे त्या साखर कारखान्यांना कमी दरात साखर विकणे परवडत नाही, त्यामुळे “एफआरपी’ची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहण्याची शक्‍यता आहे.याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. कमी दरात साखर विकणाऱ्या साखर कारखान्यांच्या चौकशी करून कडक कारवाई करावी, तसेच 2900 रूपये हा भाव गेल्या वर्षीची “एफआरपी’ डोळ्यांसमोर धरून केला आहे. वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता, यावर्षी साखरेच्या विक्रीचा दर किमान 3,400 रुपये प्रति क्विंटल करण्याची आवश्‍यकता आहे. थकलेली “एफआरपी’ लक्षात घेता सरकारने साखरेचे भाव तातडीने 3,400 रुपयांपर्यंत स्थिर करावेत, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

तर, साखरेचे भाव वाढविण्याचे सरकार विचार करीत असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, तसेच जे साखर कारखाने कमी दरामध्ये साखर विकतील, त्यांची चौकशी करून त्वरीत करण्यात यावी, असे आदेश रामविलास पासवान यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांना दिले. खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत यांची भेट घेऊन त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली, यावेळी रविकांत यांनी ताबडतोब चौकशी करून जे कमी दरामध्ये साखर विकलेले आढळून येतील, त्यांना साख़र विक्रीचा कोटा त्वरीत रद्द करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)