29 व्या पुणे फेस्टिव्हलचे आज उद्‌घाटन

पुणे – संगीत, नृत्य, नाट्य, कला, गायन, वादन, क्रीडा व संस्कृती यांचा संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा 29 वे वर्ष साजरे या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन उद्या (शुक्रवार) ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई आणि ज्येष्ठ अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. याप्रसंगी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक, उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, भारत सरकारचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यावतीने फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन उद्‌घाटन सोहळ्यात गौरविले जाणार आहे. यंदा अभिनेते शेखर सुमन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आय.टी. तज्ज्ञ आनंद खांडेकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवास 125 वर्षे होत असून त्यानिमित्त पुण्यातील कसबा गणपती मंडळ, केसरी गणेशोत्सव, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, तांबडी जोगेश्‍वरी गणेशोत्सव मंडळ, भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश पेठ पांगुळ आळी गणेशोत्सव ट्रस्ट, राजाराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनिपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि हत्ती गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा उद्‌घाटन सोहळ्यात विशेष गौरव करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)