अफगाण एअरफोर्सने केली एअर स्ट्राईक
काबुल – अफगाणिस्तानच्या फारयाब भागात अफगाण एअर फोर्सने केलेल्या एका हवाई हल्ल्यात 28 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. फारयाब भागातील सेनेच्या 209 शाहीनच्या प्रवक्त्याने सिन्हुआ या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. यावेळी या वृत्तसंस्थेच्या माहिती नुसार अफगाणिस्तान वायू सेनेच्या के एक ए-29 या विमानाने शनिवारी संध्याकाळी फारयाब भागातील बिलचीराग जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यात 28 दहशतवादी मारले गेले.
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, हे दहशतवादी सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना आखत होते. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या वायुसेनेने त्यांच्या तळावर हल्ला केला. यात उपस्थित असलेल्या 28 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानच्या उत्तर भागात हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कारण, अफगाणिस्तानचे सुरक्षा दल दक्षिण आणि पूर्व भागात दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करत आहे.