28 लाख शेतकऱ्यांना सरकार मोबाईल फोन देणार

रांची (झारखंड), दि. 4-राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांना सरकार मोबाईल फोन देणार असल्याची घोषणा झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केली आहे. आज मंत्रालयात आयोजित एका कृषी बैठकीत ते बोलत होते. कृषी क्षेत्रामध्ये झारखंडच्या शेतकऱ्यांचे श्रेष्ठत्त्व साऱ्या जगाला मानावे लागेल असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी नुकतेच इस्रायलला जाऊन आलेल्या शेतकऱ्यांनी त्या दौऱ्यात आपल्याला आलेले अनुभव सांगितले. शेतकऱ्यांना आपली मते मोकळेपणाने मांडण्याची संधी देत असताना रघुवर दास यांनी कृषी विभागाला सूचना दिली की प्रगत शेतीसाठी झारखंडमधील शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.

18 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्या मुख्यालयांमध्ये कॅंप लावण्यात येणार आहेत. या कॅंपमध्ये शेतकऱ्यांना शेती विम्याची संपूर्ण रक्कम देण्यात येणाऱ आहे, असे स्पष्ट करून रघुवर दास यांनी घोषणा केली, की याच काळात 28 लाख शेतकऱ्यांना मोबाईल फोन वितरित करण्यात येतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
43 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)