28 फेब्रुवारीला जिओ करणार मोठी घोषणा करण्याची शक्‍यता

नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि दक्षिण कोरियातील दिग्गज सॅमसंग कंपनी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.
26 फेब्रुवारीपासून स्पेनच्या बार्सिलोना शहरात मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसची सुरुवात होत आहे. यात नवे स्मार्टफोन लॉंच केले जाणार आहेत. 28 फेब्रुवारीला जिओ आणि सॅमसंग या दोन कंपन्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान रिलायन्स जिओ आणि सॅमसंग काही मोठी घोषणा करण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रसारमाध्यमांना निमंत्रित देखील करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओ आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातही पाऊल टाकणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय सॅमसंगसोबत काही करारही केले जाण्याची शक्‍यता आहे. ज्यामुळे लोकल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जिओ आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)