हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन

पानशेत – खानापूर (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य पी. टी. थोरात यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करून आपणही देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करूया. सकाळी 11 वाजता सर्व हुतात्म्यांना एक मिनिट उभे राहून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख शशिकांत जाधव, भीमराव आदलिंग आणि बाळासाहेब रूपनवर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)