जनसुविधांसाठी ग्रामपंचायतींना अनुदान

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ‘जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ ही योजना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील ज्या गावांना दहन, दफनभूमीची सोय नाही. तसेच ज्या गावांना ग्रामपंचायत इमारत नाही. अशा ठिकाणी ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान ही योजना घेण्यात आली आहे. यातून 16 कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली.

याविषयी माहिती देताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकाते यांनी सांगितले, 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत विभागासाठी 12 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायतींच्या स्मशानभूमी आर. सी. सी. शेडकरीता प्रत्येकी 5 लाख 60 हजार रूपयाप्रमाणे 3 कोटी 80 लाखांची कामे मंजूर करण्यात आली आहे.

तसेच 151 ग्रामपंचायतीसाठी स्मशानभूमी सुधारणा करीता 4 कोटी 49 लाख, तर 71 ग्रामपंचायतींसाठी ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम याकरीता प्रत्येकी 12 लाखांचा निधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ही कामे चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)