पिराच्या यात्रेनिमित्त श्रीगोंद्यात रंगली कव्वालीची मैफिल
श्रीगोंदा – येथील दिल्ली वेशीलगत असणाऱ्या तीन पिरांच्या वार्षिक यात्रेनिमित्त कव्वालीची मैफिल आयोजित करण्यात आली होती. ती मध्यरात्रीपर्यंत रंगली. विविध उपक्रमांनी यात्रोत्सवाची सांगता झाली.
हजरत बागसवार, राजबक्ष व शेशादत या तीन पिरांचा वार्षिक यात्रोत्सव एकाचवेळी साजरा करण्यात आला. पप्पू नद्दाप, जावेद फकीर व अख्तर नद्दाप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात्रेपूर्वी पिरांच्या कबरीवर चंदनलेप करण्याचा विधी पार पडला. नंतर मुस्लिमांचा फातेहा हा विधी झाला. त्यानंतर शहरातून शेरणी मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो भाविक सहभागी झाले होते. यात्रेनिमित्त पिराच्या दर्शनासाठी विविध धर्मीय भाविकांनी गर्दी केली होती. आयोजकांतर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यात्रेच्या समारोपप्रसंगी कव्वालीचा कार्यक्रम झाला. मुंबईचे प्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांनी या मैफिलीत चांगलाच रंग भरला. प्रारंभी ईशस्तवन व पैगंबरांचे गौरवगान झाले. त्यानंतर सामाजिक, राजकीय स्थितीवरील भाष्य, राष्ट्रीय एकात्मता व उर्दू साहित्यावर आधारित विविध रचना सादर करण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष बापूसाहेब गोरे, बांधकाम समितीचे सभापती अशोक खेंडके, माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे, श्रीगोंदा सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक आळेकर, विनोद खेंडके, भाऊ गोरे, आदी मान्यवरांसह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजनात सर्फराज मणियार, जावेद सय्यद, रियाज पेंटर, इसहाक शिकलकर, फैय्याज मणियार, अन्नू अत्तार, आसिफ नद्दाप, मोईन सय्यद, आदींचे मार्गदर्शन लाभले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)