अकोले तालुक्‍यातील 103 हातपंपांची दुरुस्ती
अकोले – अकोले तालुक्‍यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तालुक्‍यातील सर्व धरणे तुडुंब भरून वाहतात. मात्र, उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असते. यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्‍यातील 103 बंद असलेल्या हातपंपांची दुरुस्ती करत अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावल्याची माहिती उपसभापती मारुती मेंगाळ यांनी दिली.
तालुक्‍यात भंडारदरा, निळवंडे, पिंपळगाव खांड, पाडोशी यासारखी मोठमोठी धरणे आहेत. पावसाळ्यात सर्व भरून वाहतात. उन्हाळ्यात मात्र याच तालुक्‍यातील काही गावांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भासते. यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्‍यातील बहुतांशी गावांमध्ये जुने हातपंप दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या पंपांना मोठ्या प्रमाणात पाणी होते. नादुरूस्त होऊन वर्षानुवर्षे ते बिघडलेल्या स्थितीत तसेच पडून होते. या सर्व हातपंपांची पाहणी करून अनेक वर्षांपासून नादुरूस्त असलेल्या केळी रुम्हणवाडी, कोंभाळणे, देवठाण, जांभळे, ब्राम्हणवाडा, कोहंडी, कोथळे, तळे, म्हाळुंगी, कोथळे, धामणगाव आवारी, कळस खु., खडकी, वाजुळशेत, पिसेवाडी, पेंडशेत, गणोरे, धुमाळवाडी, केळुंगण, मोग्रस, आदी गावांतील 103 हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)