रांजणगावचा संघ “शिरूर प्रिमियर लीग’चा मानकरी

शिरूर- शिरूर येथे आयोजित माजी नगराध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारिवाल क्रिकेट चषकावर रांजणगाव गणपती इलेव्हन संघाने नाव कोरले असून हा संघ “शिरूर प्रिमियर लीग’चा मानकरी ठरला. तर शिरूर येथील सुवर्णमुद्रा वॉरियर्सचा संघ उपविजेता ठरला. दरम्यान, या अंतिम सामन्याचे आकर्षण ठरला तो आयपीएल खेळडू राहुल त्रिपाठी.
शिरूर येथे नगरसेवक रवींद्र ढोबळे यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस समारंभ उद्योगपती प्रकाश धारिवाल, आयपीएल खेळाडू राहुल त्रिपाठी, उद्योगपती आदित्य धारीवाल यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, बाजारसमिती सभापती शशिकांत दसगुडे, क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष संजय पाचंगे, शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख नीलेश लंके,, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे, चेतन कुरुंदळे, हभप किरण महाराज भागवत, नगरसेवक संजय देशमुख, मुजफ्फर कुरेशी, अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, नितीन पाचर्णे, संदीप गायकवाड, बाजार समिती संचालक बाबासाहेब सासवडे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा, दादासाहेब गवारे, बादशहाभाई मण्यार, प्रवीण दसगुडे, दादाभाऊ वाखारे, राजेंद्र ढोबळे, शिक्षण मंडळ सदस्य तुकाराम खोले, विद्याधाम प्राशालेचे गोरक्ष दळवी, नसीम खान, श्रीकांत पाचुंदकर, जयसिंग धोत्रे, निलेश कोळपकर, अमजद सौदागर, किरण आंबेकर, सनी दळवी, संतोष शिंतोळे, गुलाम पठाण, फिरोजभाई बागवान, सागर ढवळे, रावसाहेब चक्रे, दत्ता पवार, राहुल पवार, रवींद्र जाधव, पंच दगडू त्रीमुखे, पोपट चव्हाण, शफीकभाई शेख, रवींद्र गुलादे, अजय ढोबळे, विजय ढोबळे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या स्पर्धेतील अंतिम सामना पहाण्यास शिरूर शहर व तालुक्‍यातून सुमारे दहा हजार प्रेक्षक उपस्थित होते.
यास्पर्धेत रांजणगाव गणपती इलेव्हन, राकेश जगताप सुवर्णमुद्रा वॉरियर्स शिरूर, नामदेव पडवळ आळेफाटा, कुंजिरवाडी संघ, शिरूर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकविला. यावेळी सर्व विजेते संघांना शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष कै. केशरसिंग खुशालसिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ शिवसेवा मंडळाचे विश्‍वस्त श्रीनिवास केशरसिंग परदेशी यांच्या वतीने आकर्षक स्मृतीचिन्ह, रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले. मालकावीर : गणेश जाधव, उत्कृष्ट गोलंदाज : बंटी पोटघन, उत्कृष्ट यष्टीरक्षक : निलेश भापकर, उत्कृष्ट फलंदाज : वसीम शेख, उत्कृष्ट झेल : हसन मदारी, सलग तीन षटकार : बबलू पाटील, सलग तीन चौकर : समीर जाधव, हॅट्रीक : असिफ शेख यांना विविध पारितोषिके देवून गौरविण्यत आले.

  • शिरूरमध्ये राहुल त्रिपाठी सारखा एक उदयन्मूख खेळाडू येऊन येथील क्रिकेट प्रेमींना मार्गदर्शन करून त्यांच्या उत्साह वाढवतो हे शिरूरसाठी गौरवास्पद आहे.
    – प्रकाश धारिवाल, उद्योगपती
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)