तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे,दि.29 (प्रतिनिधी)- मुंढवा येथील आयटी कपनीत काम करणा-या 22 वर्षीय तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी घडला. ही घटना पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीत घडली. संबंधीत तरुणी काही दिवस कामावर गैरहजर होती. सोमवारी सकाळी ती कामावर दाखल झाल्यावर तीने लॉन इन न करता थेट गॅलरीतून उडी टाकली. यामुळे कार्यालयातील सहकार्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

अश्विनी गवारे (वय-22, रा.शिरूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
अश्विनी ही मुंढव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या सॉफ्टवेअर कंपनीत काही महिन्यापूर्वीच कामाला लागली होती. ती कामही व्यवस्थित करत होती. मात्र मागील काही दिवसांपासून ती रजेवर होती. यासंदर्भात तीच्या टीम लिडरने तीच्याशी संपर्क साधला होता. यानंतर ती सोमवारी सकाळी ती कामावर हजर झाली. तीने कार्यालयात हजेरी लावली मात्र संगणकावर लॉन इन न करताच ती गॅलरीत त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि थेट खाली उडी मारून आत्महत्या केली. ती खाली पडल्यावर खाली असलेल्या नागरिकांनी आरडा ओरडा केला. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी खाली बघितले असता. ती अश्‍विनी असल्याचे समजले. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. ती ऑक्‍टोबर 2017 पासून ती या कंपनीत नोकरीस होती. तिने राजीनामा दिला होता, परंतु तो ऑफिसकडून नाकारण्यात आला होता. तीला कंपनीनी कामावर हजर रहाण्याची विनंती केली होती. तीला वडिल नसून ती येथे आत्याकडे रहात असल्याचे समजते. तीने घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्या असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)