वर्षाला २ कोटी नौकाऱ्यांचे आश्वासन देणाऱ्यांच्या काळात दिवसाला २७ हजार नौकऱ्या घटतायेत : दिग्विजय सिंह

काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेरोजगारीच्या प्रश्नावरून गंभीर आरोप लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधताना दिग्विजय सिंह म्हणाले की, “२०१४मध्ये सत्तेत येताना पंतप्रधान तथा त्यांच्या पक्षीयांतर्फे वर्षाला २ कोटी नौकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले गेले होते मात्र प्रत्यक्षात नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील जनतेला दिवसाला २७ हजार नौकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ही आकडेवारी माझी नसून ती अधिकृत संस्थांद्वारे देण्यात आली आहे.”

यावेळी बोलताना दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचार अजेंड्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “२०१४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते देशभरामध्ये गुजरात मॉडेलचा गाजावाजा करत असत मात्र पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे रंग बदलले असून विकासाचे हे मॉडेल त्यांनी केवळ देशातील काही धनदांडग्यांसाठीचं राबविले आहे. काँग्रेसच्या काळात जे-जे महत्वाचे निर्णय घोषित करण्यात आले होते त्या निर्णयांना मोदींनी त्यावेळी विरोध दर्शवला होता मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी त्याच योजना राबवत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.”

दिग्विजय सिंह पंतप्रधानांवर निशाणा साधताना, “२०१४ निवडणुकांपूर्वी मोदी आपल्या निवडणूक उमेदवारी अर्जावर कधीही त्यांच्या विवाह संबंधीची माहिती भारत नसत तसेच ते त्यांच्या शिक्षणाविषयीची माहिती देखील उघड करीत नाहीत. मला त्यांच्या खासगी जीवनावर टिपण्णी करायची नाही परंतु जनतेसमोर सत्य मांडण्यास काय हरकत आहे?” असे प्रश्न उपस्थित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)