27% तरुणाई इंटरनेटच्या विळख्यात

चिंतेत वाढ : वयाच्या 11व्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांत वाढतेय व्यसन

पुणे – सोशल मीडिया, ऑनलाइन शॉपिंग, गेमिंग अशा विविध माध्यमांतून इंटरनेटच्या जगात बेसुमारपणे वावरणारी तरुणाई सर्वत्र दिसते. तरुणाईतील इंटरनेट वापराबाबत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार शहरातील सुमारे 27 टक्के तरुण इंटरनेटच्या विळख्यात अडकलेली आहे. विशेषत: वयाच्या 11व्या वर्षापासूनच मुलांमध्ये हे व्यसन वाढत असल्याचे या सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे.

आनंदवन संस्थेने शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमधील मुलांच्या इंटरनेट वापराबद्दल सर्वे केला आहे. या अंतर्गत तरुणांमध्ये इंटरनेटबाबतची व्यसनाधीनता वाढल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर वाढत्या व्यसनाधीनतेचे दुष्परिणामही विशेषत: शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. तरूणांमधील वाढती हिंसकता आणि नैराश्‍य ही याची प्रमुख लक्षणे आहेत.

याबाबत संस्थेचे डॉ. अजय दुधाणे म्हणाले, “व्यसनमुक्ती या विषयावर गेली 10 वर्षे संस्था काम करत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या अनुभवांवर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन दरवर्षी केले जाते. गेल्या वर्षी “स्क्रीन अॅडिक्‍शन’ या विषयावर स्मरणिका काढताना, तरूणाईतील इंटरनेटच्या व्यसनाधीनतेबाबत काम करण्याची मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता असल्याचे आमच्या लक्षात आले. त्याअनुषंगाने काम करत असताना सर्वप्रथम संस्थेकडून याबाबतचा सर्वेक्षण करण्यात आला. त्यातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.’

ही गरज लक्षात घेत, संस्थेच्या दहाव्या वर्षात पदर्पणाचे औचित्य साधत संस्थेतर्फे सामाजिक गरज म्हणून टिळक रस्ता येथे राज्यातील पहिल्या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले जाणार आहे. रविवारी (दि.18) सायंकाळी 5 वाजता हा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. या अद्ययावत केंद्रात ई-व्यसन, मेडिकल ओपीडी, बायो फिडबॅक, ब्रेनमॅपिंग, ध्यान, औषधोपचार यांच्या माध्यमातून विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर पालककट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून पालक, बालक, शिक्षक यांच्यासाठी एकत्रित कार्यक्रम घेत इंटरनेट व्यसनाधीनतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

ज्येष्ठांमध्ये वाढतेय “टीव्ही’चे व्यसन :
निवृतीनंतर मिळणारा रिकामा वेळ, धावत्या जीवनशैलीमुळे दुरावलेले नातेवाईक, एकाकीपणा या सर्वांचा परिणाम म्हणून शहरातील ज्येष्ठ नागरिकांमधील हे टेलिव्हिजनचा वापर वाढला आहे. टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांत गुरफटलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या मालिकांमुळे व्यसन लागत असल्याचे संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. अनेकदा ही पात्रे प्रत्यक्षात आहेत, अथवा घरातील सदस्यांमध्येच ही पात्रे असल्याचे वाटत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे वागणुकीत विचित्र प्रकारचा बदल होत असल्याचेही या अभ्यासात दिसून आले आहे.

व्यसनाचे दुष्परिणाम :
– झोप पुरेशी होत नाही.
– नैराश्‍य येते.
– इतर व्यसनांकडे वळतात.
– हिंसकता वाढते.
– इतर मानसिक आजारांची शक्‍यता
– नात्यांमधील संशयी वृत्ती वाढते.

व्यसनांचे प्रकार :
– शॉपिंग अॅडिक्‍ट
– गेमिंग अॅडिक्‍ट
– सोशल मीडिया अॅडिक्‍ट
– अटेंशन सीकिंग
– टेलिव्हिजन अॅडिक्‍ट


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)