268 महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित

जिल्ह्यातील 19 मंडलांचा समावेश


शासनाच्या सोयी-सवलती होणार लागू

पुणे – राज्य शासनाने यापूर्वीच राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्‍यांतील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. अशा राज्यातील 268 महसुली मंडलांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. या महसुली मंडलामध्ये जिल्ह्यातील 19 मंडलांचा समावेश आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्‍यांबरोबरच या 19 मंडलांमधील गावांनाही शासनाच्या सोयी-सवलती लागू होणार आहेत.

जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्‍याच्या सरासरी पर्जन्याच्या 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिमी पेक्षा कमी झाला आहे. अशा 238 महसूल मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करून शासनाकडून मदत केली जाणार आहे. दुष्काळी भागांतील नागरिकांना सोयी-सुविधा तसेच त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाकडे या गावांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू विजबिलात 33.5 टक्‍के सूट, शालेय अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांचा शेतीच्या पंचांची वीज जोडणी खंडीत न करणे, अशा सवलती शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील महसूल मंडल
हवेली तालुक्‍यातील थेऊर, उरुळीकांचन, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली. मुळशी तालुक्‍यातील थेरगाव. भोर तालुक्‍यातील वेळू, जुन्नरमधील जुन्नर, नारायणगाव, वडगाव, निमुलगाव, बेल्हा, ओदूर, खेड तालुक्‍यातील चाकण, आळंदी, पिंपळगाव, कान्हेरसर या महसूल मंडलांचा समावेश दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)