2616 दिव्यांगांना बस पास

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 2616 दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएलचे मोफत बस पास वाटप करण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे 4 कोटी 25 लाख रुपये खर्च आला आहे.

महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील अंध, अपंग, मूकबधीर आदी दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलचे मोफत बसपास देण्यात येतात. सन 2018-19 या आर्थिक वर्षांमध्ये त्यासाठी दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार 2616 अर्ज प्राप्त झाले आणि ते सर्व अर्जधारक पात्र ठरले आहेत. त्यातील 2244 दिव्यांगांचे मी कार्ड नूतनीकरण करण्यात आले आहेत, तर नवीन 372 दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांना मी कार्ड काढून देण्यात आले आहेत. प्रत्येकी 1400 रुपये प्रमाणे पीएमपीएमएल बस पासपोटी 4 कोटी 25 लाख 29 हजार 300 रुपये इतका खर्च झाला आहे. ही रक्कम मिळावी, यासाठी पीएमपीएमएलच्या सह व्यवस्थापकीय संचालकांनी बील सादर केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2018-19 या आर्थिक वर्षात नि:समर्थ, कर्णबधीर, अंध विद्यार्थी, व्यक्तींना मोफत पीएमपीएमएल बसपास या उपलेखाशिर्षावर साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही रक्कम शिल्लक आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएमएल प्रशासनाला यापूर्वी अडीच कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. उर्वरित 1 कोटी 75 लाख 29 हजार 800 रुपये इतकी रक्कम अदा करावयाची आहे. ही रक्कम सन 2018-19 च्या आर्थिक वर्षातील तरतुदीतून अदा करण्यात येणार आहे. महापालिका स्थायी समिती सभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)