२६/११: सत्ताधारी भाजपला शहिदांचा विसर! विखे पाटलांच्या मागणीनंतर विधानसभेत आदरांजली

File Photo

मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण झाली. यामुळे देशभरातुन या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मात्र सत्ताधारी भाजप सरकारला याचा विसर पडला आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असून आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारकडून मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला जाईल, अशी अपेक्षा होती मात्र असा कोणताही ठराव मांडला नाही.

मात्र, सरकारने तसा ठराव न मांडल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाच्या अध्यक्षांकडे तशी मागणी केली. ते म्हणाले की, या हल्ल्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचे अनेक अधिकारी व जवान शहिद झाले. अनेक निरपराध नागरिकांचाही बळी गेला. त्यामुळे विधानसभा सुरू असताना आदरांजली अर्पण करून त्यांचे स्मरण केले गेले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही विखे पाटील यांच्या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाची भावना लक्षात घेता मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला.

 

विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते मा. राधाकृष्ण विखे पाटील

Posted by Indian National Congress – Maharashtra on Monday, 26 November 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)