मुंबई – मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मरीन लाईन्स पोलीस जिमखाना येथील शहीद स्मृतिस्थळाला राज्यपाल चे.विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पदुममंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार ऍड.आशिष शेलार, राज पुरोहित, भाई जगताप, अमीन पटेल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल, अमेरिकेचे राजदूत केनिथ जस्टर, एनएसजी कमांडो हेमंत साहनी, शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.
कोकुयो कॅम्लिन लिमिटेडतर्फे 26/11 चा थरार चित्ररूपात मांडला आहे. या पेंटिंग इन्स्टॉलेशनचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पेंटिंगची पाहणी करुन कौतुक केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा