26/11च्या हल्ल्यातील शहीद जवानांना म्हसवडमध्ये श्रद्धांजली

म्हसवड – मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांची लढताना शहीद झालेल्या वीर जवानांना म्हसवड येथे कॅंडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. म्हसवड पोलिस व नागरीकांच्यावतीने काढण्यात बसस्थानक चौक ते महात्मा फुले चौक दरम्यान हा कॅंडल मार्च काढण्यात आला. चौकात शहीद जवानांच्या फोटो पुढे कॅंडल व फुले वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी शहीद जवान अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण वडणेरे, अनुराधा देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, पालिकेचे गटनेते धनाजी माने, नगरसेवक शहाजी लोखंडे, विकास गोंजारी, आप्पासाहेब पुकळे, राहुल मंगरुळे, एस. पी. बागल, इंदलकर, काका माने, सुरेश उबाळे, हणमंत पाटील, बाळासाहेब सरतापे, यांचेसह बहुसंख्य म्हसवडकर नागरिक व पोलिस स्टेशनचे कमॅंचारी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)