अहमदाबाद (गुजरात्) – आयुष्याची 26 वर्षे अकारणच तुरुंगात काढल्यानंतर निर्दोष सुटका झाल्याची घटना गुजरातच्या जयंती भाई राणांच्या जीवनात घडली आहे. उत्तर गुजरातच्या बनासकाटा जिल्ह्यातील जयंती भाई राणा यांना खुनाच्या आरोपावरून शिक्षा झाली होती. रामसिंह यादव नावाच्या एक व्यक्तीचा खून केल्याच्या आरोपावरून पोलीसांनी जयंती भाई राणा यांना अटक केली होती. गुन्हा केलेला नसूनही पोलीसांनी मारहाण करून त्यांच्याकडून कबुलीजबाब घेतला. (प्रत्यक्षात हा गुन्हा झालाच नसल्याचे पुढे सिद्ध झाले.)

पोलीसांनी जयंती भाईंना पकडल्यानंतर तत्कालीन इन्स्पेक्‍टर एम जी धराजिया यांनी जयंती भाईंकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण पैसे न दिल्याने त्यांना केसमध्ये अडकवले. न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
मात्र काही वर्षांनी ज्याचा खून केल्याच्या आरोपावरून जयंती राणांना तुरुंगात जावे लागले होते, तो रामसिंह यादवच न्यायालयात हजर झाला. त्याने आपल्या खुनाची गोष्ट खोटी असल्याचे सांगितले.

डिसा कस्बा न्यायालयाने रामसिंह यांना जिवंत पाहून जयंती भाईंना निर्दोष सोडण्याचा आणि त्यांना 75 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आणि त्याचबरोबर त्यांना अडकवणाऱ्या इन्स्पेक्‍टर धराजिया आणि त्यांच्या सहकाऱ्याला कठोर शिक्षा सुनावण्याचे आदेश दिले आहेत.

आयुष्यातील अत्यंत उमेदीची 26 वर्षे अकारणच तुरुंगात जाऊनही जयंती भाई नाराज नाहीत, तर त्यांनी आपल्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)