26 आठवड्याच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी

मुंबई – सोलापूर येथील 25 वर्षाच्या गर्भवती महिलेच्या मानसीक आरोग्यावर होणारा परिणाम आणि व्याधीग्रस्त गर्भाचा गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. जे.जे. रुग्णालयाच्या अहवालनंतर न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली.

26 आठवड्यांची गर्भवती असलेल्या 25 वर्षाच्या महिलेने गर्भाला आजार असल्याने त्याला जन्मानंतर धोका असल्याचा अहवाल डॉक्‍टरांनी दिल्यानंतर गर्भपाताची परवानी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेची न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेऊन जे. जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञांना तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अहवाल सादर करण्यात आला.

गर्भाला गंभीर आजार असल्याने भविष्यात त्याच्या जिवितास धोक असल्याचा अहवालात नमुद करण्यात आल्याने न्यायालयाने या 25 वर्षाच्या महिलेस तातडीने गर्भपात करण्यास परवानगी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)