मुंबई विद्यापीठाला 25 हजारांचा दंड

मुंबई: मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या गलथान कारभारामुळे विद्यापिठ सतत चर्चेत असते. आता माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने राज्य माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने माहिती अधिकाराअंतर्गत मुंबई विद्यापीठाकडून 2010 ते 2017 यावर्षात उतरपत्रिकांच्या पुनर्मुल्याकणासाठी घेण्यात आलेली एकूण रक्कम आणि पुनर्मुल्याकनासाठी होणार एकूण खर्च याबाबतची माहिती मिळावी, यासाठी अपील केले होते. मात्र, विद्यापीठाकडून ही माहिती न मिळाल्याने एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा माहिती मागविण्यासाठी आकाशने राज्य माहिती आयोगाकडे अपील केले. तरीही मुंबई विद्यापीठाने माहिती दडवल्याने राज्य माहिती आयोगाने 25 हजार रुपयाचा दंड मुंबई विद्यापीठाला ठोठावला आहे. तसेच कुलगुरुंना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

-Ads-

मुंबई विद्यापीठ पुनर्मुल्याकनासाठी कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांकडून घेते. मात्र पुनर्मुल्याकन आणि फोटोकॉपीसाठी होणारा खर्च लाखांमध्ये आहे. मग बाकीचे पैसे कुठे जातात? असा प्रश्न अनेक विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)