250 कोटींच्यावर होणार चुराडा

निवडणूक झाली महागडी

मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने होणार छुपा खर्च

नगर – महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झाली आहे. प्रचारासाठी अवघे सात दिवस बाकी असल्याने उमेदवारांसह सर्व पक्षीय पक्षांचे कार्यकर्ते दिवसरात्र प्रचारावर भर देत आहेत. निवडणुका म्हटले की खर्च हा आलाच. अर्थात या निवडणुकीसाठी उमेदवारांना पाच लाख रुपये खर्च मर्यादा दिली असली तरी या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने छुपा खर्च होणार आहे. या निवडणुकीत आता 340 उमेदवार रिंगणात आहे. पाच लाख मर्यादा असली तरी उमेदवारांचा सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च होण्याची शक्‍यता आहे. याचा विचार केला तर या निवडणुकीत तब्बल 250 कोटींचा चुराडा होण्याची शक्‍यता आहे.

मागील निवडणुकीच्या तुलनेने यावेळी निवडणूक महागडी झाली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. यात प्रभाग रचनेमुळे प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. मोठ मोठे प्रभाग झाले आहेत. प्रभागात 13 ते 14 हजार मतदार झाले आहेत. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या निवडणुकीच्या काळात कोणालाही नाराज करता येत नाही. त्यामुळे त्याच्या अपेक्षेपोटी काही तरी खर्च करावाच लागतो. त्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. निवडणुका म्हटले की जेवणावळी, हॉटेलींग, प्रचारासाठी वाहने, साहित्य, फलक, प्रचारपत्रके, कार्यकर्ते या सर्वच बाबी खर्चिक आहेत. त्यामुळे उमेदवारांना दररोज लाखांत खर्च करावा लागतो.

उमेदवारांकडून अनेक अपेक्षा असतात. त्याला त्या पूर्ण करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नसतो. अशावेळी अनेक जण उमेदवारांना याना त्या मार्गाने अक्षरशः चावत असतात. तोही नाईलाच म्हणून व कोणाची नाराजी ओढून घेण्यापेक्षा त्याला खुश करण्याचा प्रयत्न करीत असतो. महापालिका निवडणुकीला उमेदवाराला पाच लाख रुपये मर्याद आहे. एक प्रभागात पक्षाचे चार उमेदवार रिंगणात असल्याने सुमारे 20 लाख रुपये एकत्रिपणे पैसा उभा राहणार असला तरी हा खर्च त्याच्या दृष्टीने कमी पडत आहे. एक उमेदवाराचा सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च होण्याची शक्‍यता आहे. त्याचा विचार केला तर या निवडणुकीत सुमारे 250 कोटीच्यावर चुराडा होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)