वन्यजीवांसाठी सोडले 25 हजार लिटर पाणी

आनंदऋषीजींच्या स्मृतीनिमित्त राजेंद्र गांधी मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम

नगर: आचार्यसम्राट आनंदऋषीजी महाराज यांचा दि. 28 रोजी स्मृतीदिन होता. त्यांच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक जीवासाठी माणसाने आपले तन, मन, धन अर्पण केले पाहिजे. त्या जीवासाठी आपण कामी आले पाहिजे. हि शिकवण प्रत्यक्षात अंमलात आणली ती राजेंद्र गांधी मित्र मंडळ यांनी. सध्या दुष्काळाचा मोठा तडाखा बसलेला आहे. दोन वर्षांपासुन पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे नैसर्गिक पाणवठे कारडेठाक पडलेले आहेत.

वन्य पशुपक्षी व प्राणी यांना रानात पिण्याचे पाणी नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे येत आहेत. गेल्या महिन्यापासुन डोंगरगण येथे दर पंधरा दिवसांनी 25 हजार लिटरचा टॅंकर सोडुन वन्य पशुपक्षांची तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांच्या सहभागातुन हा उपक्रम सुरू असुन नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

येथील सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या राजेंद्र गांधी मित्रमंडळ यांनी आनंदऋषीजी महाराज यांची शिकवण प्रत्यक्षात अंमलात आणुन वन्य पशुपक्षांसाठी आज दि.29 रोजी डोंगरगण येथे 25 हजार लिटर पाणी नैसर्गिक पाणवठ्यात सोडले. पाणी सोडल्याबरोबर लगेच बऱ्याच प्रकारचे पक्षी पाण्यासाठी आले. त्यामधे कावळे (जंगल क्रो), निलिमा (टिकेल्स ब्ल्यु फ्लायकॅचर), चष्मेवाला (व्हाईट आय), नाचन (फॅनटेल), होले, तांबड (कॉपरस्मिथ बारबेट), बुलबुल (रेड व्हेन्टेड बुलबुल), शिंपी (टेलर बर्ड), टोपीवाला (ग्रेट टिट) आदी पक्षी होते. काही पाणी पित होते तर काही आनंदाने त्या पाण्यात अंघोळ करत होते. पाणी पाहुन निसर्गात एकदम आनंदी वातावरण झाले होते.
सदर उपक्रमासाठी 25 हजार लिटरचा पाण्याचा टॅंकर अर्बन बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या आर्थिक सहभागातून दिला होता. सदर उपक्रमासाठी रोहित वाळके, सलमान आर्मेचरवाला, सचीन तुंगार, रुषिकेश लांडे, प्रसाद खटावकर, विद्यासागर पेटकर, विठ्ठल कुटे, प्रमोद कानडे, भैरवनाथ वाकळे, संजय दळवी, कदम पाटील, संदीप पवार आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)