बॉलिवूडपासून बरेच दिवस दूर राहिलेली प्रियांका चोप्रा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींमुळे चर्चेत यायला लागली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्याला एक लव्ह पार्टनर मिळाल्याचे सोशल मिडीयावर मान्य केले होते. या तिच्या लव्ह पार्टनरविषयीची माहिती आता उघड होते आहे. 35 वर्षांची प्रियांका चोप्रा एका 25 वर्षीय गायकाबरोबर डेटिंग करते आहे. सध्या ती याच युवकाबरोबर वेळ घालवत असते. निक जोनास असे या अमेरिकन गायकाचे नाव आहे. दोघांचेही काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. प्रियांका या निक जोनासपेक्षा तब्बल 10 वर्षांनी मोठी आहे. येत्या जुलै महिन्यात ती 36 वर्षांची आणि सप्टेंबरमध्ये निक 26 वर्षांचा होणार आहे.

निक आणि प्रियांका दोघांपैकी कोणीही अद्याप आपल्या रिलेशनशीपबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र त्यांच्या काही निकटवर्तीयांनी त्यांच्यातल्या रिलेशनशीपबाबतची माहिती दिली आहे. हे दोघेही सातत्याने डेटिंग करत असतात. वयात एवढे अंतर असूनही एखाद्या बड्या अभिनेत्रीने अगदी युवा गायकाबरोबर डेट करणे अगदीच नवीन बाब आहे.

प्रियांका आणि निक यापूर्वीही एकत्र असल्याचे बघितले गेले आहे. काही पार्ट्यांमध्येही त्यांना एकत्र बघितले गेले होते. पण अलिकडेच या दोघांचा एक विशेष फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हे दोघेही एका बोटीमध्ये आपल्या काही निवडक मित्रांबरोबर मौज मजा करताना दिसत आहेत. शुक्रवारी लॉस एंजेलिसमध्ये ती निक बरोबर “ब्युटी ऍन्ड बीस्ट’ लाईव्ह कॉन्सर्टला उपस्थित होती. इंग्लंडमध्ये ती बेस्ट फ्रेंड मेघन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहिली होती. सध्या प्रियांका कॅलिफॉर्नियामध्ये आहे. नुकतीच ती विक एन्ड निकबरोबर घालवायला इंग्लंडमधून अमेरिकेला परत गेली आहे.

यापूर्वी निक आणि मॉडेल ओलिविया कल्पो यांच्या रिलेशनशीपची जोरात चर्चा होती. मात्र ही ओलिवियापण निकपेक्षा मोठी होती. तिला लवकरच तिच्या वयाचा नवीन जोडीदार मिळाला आणि निकने नवीन जोडीदार म्हणून प्रियांकाला निवडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)