25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस मद्यविक्री केल्यास कठोर कारवाई- दिल्ली सरकार

नवी दिल्ली-25 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस मद्यविक्री केली, तर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा दिल्ली सरकारने सर्व मद्यविक्रेते, हॉटेल्स, क्‍लब्ज, बार आणि पब्जना दिला आहे. मद्यविक्री आणि मद्यपानाच्या नियमांचे पालन न करणारांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांना कळवण्यात आलेले आहे.
दिल्ली अबकारी कायद्यानुसार राजधानी दिल्लीमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मद्य देणे वा मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. आणि दिल्ली सरकार या नियमाचे काटेकोर पालन करायला लावणार आहे. जर मद्यासाठी आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वयाबद्दल लायसन्सधारी विक्रेता, त्याचा कर्मचारी आ एजंट यांना संशय आला, तर त्याचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे वयाचा पुरावा मागता येईल.

दिल्ली अबकारी कायदा 2009 च्या कलम 23 नुसार कोणीही व्यक्ती वा परवानाधारक विक्रेता वा त्याचा कर्मचारी वा एजंट 25 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मद्य देऊ शकत नाहीत वा मद्यविक्री करू शकत नाहीत. तो एक गंभीर गुन्हा मानला जातो. हा गुन्हा सिद्ध झाला तर परवाना निलंबित करणे/रद्द करणे/दंडासह कठोर कारवाई केली जाऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)