25 मिळकतींवर ‘बुलडोजर’

मांजरी – मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या 25 मिळकतींवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवारी कारवाई करण्यात आली. अचानकपणे झालेल्या या कारवाईने मिळकतदारांची मोठी धावपळ उडाली. याशिवाय पूर्वी निश्‍चित केलेल्या हद्दीपेक्षाही अधिक अंतरावर कारवाई करून आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप मिळकतदारांनी केला आहे.

मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. या कामात अडथळा ठरणाऱ्या रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूच्या मिळकतींवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सकाळी दहा वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जात आहे. त्यामध्ये काही बांधकामे, त्यापुढील शेड, कुंपन व इतर व्यावसायिक टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
अतिक्रमणे काढताना बांधकाम विभागाने रस्त्याचा मध्य चुकीच्या पध्दतीने ठरवला आहे. यापूर्वी चोवीस मीटरसाठी संपादनाची नोटीस आलेली आहे. मात्र, मंगळवारी अचानक तीस मीटरचे संपादन सांगून कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. त्यामुळे मिळकतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक मिळकतदारांना मोबदलाही मिळालेला नाही, अशी तक्रार मिळकतदारांनी केली आहे. मिळकतदारांना विश्‍वासात न घेता अन्यायकारक पध्दतीने पुलाचे काम होत असेल तर त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिंक्‍य घुले यांनी दिला आहे.

पुलाच्या कामात येणाऱ्या अतिक्रमण धारकांना कारवाईबाबत नोटीस दिलेल्या आहेत. 2004 साली झालेल्या भूसंपादनानुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये येणाऱ्या सर्व मिळकतदारांना मोबदला दिलेला आहे. पुलासाठी तीस मीटर अंतरापर्यंत संपादन झालेले आहे. मंगळवारी झालेली कारवाई नियमानुसारच करण्यात आली आहे.
– नकुल रणसिंग, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)