6 न्यायाधीशांना एक वर्षांची मुदतवाढ

पुणे- जिल्ह्यातील एकूण 25 न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. तर 22 नवे न्यायाधीश बदली होऊन पुण्यात आले आहेत. तसचे जिल्हातील विविध न्यायालयांतील 6 न्यायाधीशांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

धर्मादाय सहआयुक्त शिवाजी कचरे यांची बदली झाली असूल त्यांच्या जागी मुंबईत कार्यरत असणारे डी. एम. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधि सेवा प्राधिकरणचे सचिव प्रदीप अष्टूरकर यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातर्फे प्रतिवर्षी प्रमाणे राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यातील 291 न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यातील काहींना मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्यातील आर. एच. मोहम्मद, एस. जे. घरात, एस. एस.सावंत, एम. एन. सलीम, एन. के. मनेर, एस. बी. भालकर अशी काही बदली करण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत. तर जे. एन. राजे, आर. जी. देशपांडे, ए. एस. भईसरे, एस. आर. कफरे, जी. पी. अगरवाल, एन. आर. नाईकवाडे हे नवीन न्यायाधीश जिल्ह्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 13 न्यायाधीश आणि 12 वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. तर 13 न्यायाधीश आणि 9 वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नव्याने रूजू होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)