25 कालवा बाधितांचा मदत निधी गायब

बॅंक, जिल्हा प्रशासनाकडून हात वर : नागरीक हतबल


कुटुंबांच्या बॅंक खात्यात एक दमडीही जमा नाही

पुणे – खडकवासला मुठा (उजवा) कालवा फूटीनंतर या पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून मदत देण्यात येत आहे. मात्र, या दुघर्टनेतील सुमारे 25 बाधितांना शासनाकडून मदत दिल्याचे जाहीर केले असले तरी, या कुटुंबांच्या बॅंक खात्यात अद्याप एक दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे हे नागरीक हतबल झाले असून या मदत प्रकरणी बॅंक आणि जिल्हा प्रशासनानेही हात वर केले आहेत.

27 सप्टेंबर 2018 रोजी कालव्याच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या झोपडपट्टीतील घरांसाठी नुकसान भरपाई देण्याचे आदेश तत्काळ देण्यात आले होते. त्यानुसार महसूल विभागाने या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ केले आहेत. यामध्ये 730 कुटुंबे बाधित झाली असून 90 घरे पूर्णत: तर 650 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून त्याचे वाटप सुरू असल्याचे विधीमंडळातही जाहीर करण्यात आले होते. मात्र, या बाधित कुटुंबांपैकी 25 हून अधिक नागरिकांना भरपाई मिळाली नसल्याने नागरिकांच्या तक्रारी येत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक महेश लडकत यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानंतर पूर्णपणे बाधित कुटुंबांसाठी एकूण 9 लाख 90 हजार रुपये, तर अंशतः बाधित कुटुंबांसाठी एकूण 33 लाख 45 हजार रुपये, या प्रमाणे एकूण 758 कुटुंबांना 43 लाख 35 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्य सरकार आणि महापालिका यांनी एकत्रितपणे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तरीही अद्यापपर्यंत 25 हून अधिक कुटुंबांना मदत निधी मिळालेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आम्ही निधी जमा केला आहे’
या नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्या नावावर निधी पेड झाल्याची यादी लावण्यात आली असून “आम्ही निधी जमा केला आहे’ असे सांगितले जात आहे. तर या निधी वाटपासाठी येथील एका राष्ट्रीयकृत बॅंकेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी बॅंक खातीही त्या ठिकाणी काढण्यात आली असली तरी या नागरिकांच्या नावावर निधी जमा झालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेला निधी गेला कुठे, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)