25 एप्रिलपासून टीईटीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

पुणे – शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा यंदा 8 जुलै रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेचे अर्ज भरण्याला 25 एप्रिलपासून सुरुवात होत असल्याची माहिती राज्य परिषदेचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली. राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर याआधी अपात्र ठरलेल्या अनेक शिक्षकांना टीईटीच्या माध्यमातून आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित या परीक्षेचे अर्ज यंदाही ऑनलाईन भरायवयाचे असून अर्ज भरणे व शुल्क भरण्यासाठी 25 एप्रिल ते 15 मे पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारांना 25 जून ते 7 जुलै दरम्यान त्यांचे प्रवेशपत्र परिषदेच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतील. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक 8 जुलै रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व पेपर क्रमांक 2 दुसरी 2 ते 4.30 पर्यंत घेण्यात येईल असेही डेरे यांनी सांगितले. उमेदवरांनी अर्ज भरण्यासाठी htttp://mahatet.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असेही परिषदेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिक्षक म्हणून जर नोकरी करावयाची असल्यास शिक्षण हक्‍क कायद्यानुसार शिक्षणशास्त्र पदवी व पदविकाधारकांनी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)