25 ई-बसची निविदा रद्द करा

पुणे – पीएमपीएमएलने एका विशिष्ट कंपनीला काम देण्यासाठीच 9 मी. लांबीच्या 25 बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी आलेल्या एकाच कंपनीची निविदा मान्य केली. परंतु, 12 मी. लांबीच्या 125 बसेससाठी दोन निविदा येवूनही फेरनिविदा काढून या प्रक्रियेत असलेल्या गोंधळाची स्पष्टोक्ती दिली आहे. त्यामुळे पीएमपीएमएलने पुरेशी स्पर्धा होण्यासाठी 9 मी. च्या बसेसची निविदा रद्द करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे.

शिंदे म्हणाले, सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली झुकून काही दिवसांपूर्वीच पीएमपीएमएलने 9 मी. लांबीच्या 25 बसेस 40.34 पैसे प्रति कि.मी. भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. विशेष असे की, यासाठी ओलेस्ट्रा या कंपनीची एकमेव निविदा आली होती. तर त्याचवेळी 12 मी. लांबीच्या 125 बसेसही भाडेतत्वावर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांना ओलेस्ट्रा आणि टाटा कंपनीने प्रतिसाद देत निविदा भरली. या निविदा न उघडताच केवळ पुरेशी स्पर्धा न झाल्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा हेतू दिसून येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्यक्षात मुंबईतील बेस्टने ओलेस्ट्रा कंपनीकडून ई-बसेस घेण्याचा करार रद्द केल्यानंतर ही कंपनी न्यायालयात गेली. या एकाच हेतुने पीएमपीएमएलने निविदेत कुठलिही स्पर्धा न होताही 25 बसेस घेण्याचा प्रस्ताव मंजुर केला. विशेष असे की, अद्याप ई-बसेसला मागणी नसल्याने उत्पादक कंपन्या ऑर्डर आल्यानंतरच तयार करतात. असे असताना पालिकेतील सत्ताधारी भाजपने 9 मी. लांबीच्या 25 बसेस येत्या 26 जानेवारीत सेवेत दाखल होतील, अशी घोषणाही केली. ओलेस्ट्रा या कंपनीने बेस्टसाठी तयार केलेल्या बसेस काही करून पीएमपीएमएलच्या माथी मारण्यासाठीच अन्य उत्पादक कंपन्याना बाजुला सारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हेच यातून दिसून येत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)