छत्तीसगडमध्ये वर्षभरात चकमकींमध्ये 230 नक्षली ठार

file photo

दंतेवाडा (छत्तीसगड): छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये 230 नक्षली मारले गेले आहेत. या माहितीला नक्षलींनीही दुजोरा दिला आहे, तर वर्षभरात 90 जवान शहिद झाल्याचा आणि 190 पेक्षाही अधिक जखमी केल्याचा दावाही नक्षलींनी केला आहे. मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्याने नक्षलवाद्यांची सूत्रे गणपती ऐवजी बसवराजकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

गणपतीच्या जागी महासचिव बनलेला नंबाला केशव उर्फ बसव राजू पदवीधर इंजिनीयर असून त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे, तर गणपतीवर अडीच कोटी रुपयांचे बक्षिस लावण्यात आलेले आहे.

या संदर्भात नक्षली केंद्रिय समितीचे प्रवक्ते अभय यांनी एक निवेदन जारी केले आहे. मारल्या गेलेल्या 230 नक्षलींमध्ये दंडकारण्यातील 168 नक्षली असून 75 महिला नक्षलीं असल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. या काळात नक्षलींनी सुरक्षा दलांवर 7 मोठ्या हल्ल्यांसह 300 छुपे हल्ले करून 25बंदुका आणि काडतुुसे हस्तगत केली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)