23 छावण्यांना साडेपाच लाखांचा दंड

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने चालक संस्थांमध्ये खळबळ

नगर – दुष्काळात सुरू झालेल्या छावण्यांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असल्याने छावण्याचालक संस्थांना होत असलेल्या दंडावरून वारंवार पुढे येत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे विशेष करून, छावण्याचालक संस्थावर लक्ष आहे. द्विवेदी यांनी आज 23 छावण्याचालक संस्थांवर दंडात्मक कारवाई केली. सुमारे 5 लाख 44 हजार 70 रुपयांचा दंड या छावण्यांना त्यांनी ठोठावला आहे. यापूर्वी काही छावण्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात 9 लाख 71 हजारांचा दंडा ठोठावला होता.

छावण्याचालक संस्थांकडून अनियमिततावर प्रशासनाने बोट ठेवले आहे. जामखेड, कर्जत, पारनेर, श्रीगोंदे तालुक्‍यातील छावण्याचालकांना हा दंड झाला आहे. जामखेड तालुका ः बाबुराव ढळवे संस्था जवळा, 56 हजार 950. महादेव आबा प्रतिष्ठान नान्नज 29 हजार 455. मुंजोबा मजूर सहकारी संस्था नान्नज 28 हजार 15, मंजोबा मजूर संस्था जवळा 27 हजार 650, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी संस्था मुंजेवाडी 44 हजार 905, संघर्ष सामाजिक प्रतिष्ठाण राजुरी 24 हजार 800, नंदा देवी पाणी वापर संस्था नान्नज 27 हजार 250, विश्‍वकर्मा सामाजिक संस्था काटेवाडी 25 हजार 700. कर्जत तालुका ः जिजाई बहुद्देशीय ग्रामविकास प्रतिष्ठाण 20 हजार 250, कर्जत हमाल-कामगार सहकारी संस्था 8 हजार 155, खंडेश्‍वरी मजूर संस्था 40 हजार 100, शंभुराजे ग्रामविकास प्रतिष्ठाण 64 हजार 205.

पारनेर तालुका ः पारनेर ग्रामीण बिगर ग्रामीण पतसंस्था 20 हजार. श्रीगोंदे तालुका ः पिसोरेखांड विविध कार्यकारी संस्था 21 हजार 325,भैरवनाथ प्रतिष्ठाण सारोळा सोमवंशी 17 हजार 825, गंगामाता मजूर संस्था घोगरगाव 17 हजार 225, जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था घोगरगाव 9 हजार 500, जयकिसान शेळी-मेंढी पालन संस्था बांर्गडे 15 हजार, कै. नवनाथ शिंदे सार्वजनिक वाचनालय श्रीगोंदा 6 हजार 75, भैरवनाथ ग्रामीण विकास प्रतिष्ठाण वडगुल 5 हजार, स्वामी विवेकानंद शैक्षणिक प्रतिष्ठाण श्रीगोंदा 7 हजार 500, तांळेश्‍वर मजूर सहकारी संस्था मांडूळवाडी 17 हजार, जगदंबा ग्रामीण विकास संस्था रुईखेल 5 हजार 746 रुपये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)