23 डब्यांमधून खादाडणारी श्रद्धा

सध्या साहो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर व्यस्त असून ती त्यासाठी हैदराबादच्या रामोजी राव सिटीत आहे. ती मध्यंतरी मुंबईला परत आली होती. पण पुन्हा आता ती हैदराबादला परतली आहे.

श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. तुमच्या तोंडाला तो बघून नक्कीच पाणी सुटेल. तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला हा फोटो आहे. या फोटोत तिच्या समोर जेवणाचे डबे उघडले आहेत. ते 23 डबे आहेत. त्यात खूपच छान पदार्थ दिसत आहेत. ते पाहून खुद्द श्रद्धाच्या तोंडालाही पाणी सुटले आहे. श्रद्धा नुकतीच डेंग्यूमधून बरी झाली आहे. तिने आता कामालाही सुरुवात केली आहे. आजारपणामुळे तिला खूप अशक्‍तपणा आला असावा. त्यासाठी शक्ती वाढवण्यासाठी तिला हा आहार आवश्‍यक वाटत असावा.

काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’च्या 6 व्या सीझनला सुरुवात झाली असून अनेक कलाकार या चॅट शोमध्ये हजेरी लावत असतात. करण त्यांना यावेळी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारुन अनेक गुपित उघड करत असतो. पण अभिनेत्री श्रद्धा कपूरने या शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला आहे.

श्रद्धाला कॉफी विथ करणच्या एका भागासाठी आमंत्रण देण्यात आले होते. पण येण्यास श्रद्धाने नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांसमोर बोलण्याची श्रद्धाला इच्छा नसल्याने तिने यासाठी नकार दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

श्रद्धा आणि फरहान अख्तर गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. पण या नात्याला श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांचा विरोध होता. त्यामुळे या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. श्रद्धाने याच विषयावर पुन्हा बोलणे टाळण्यासाठी या शोमध्ये येण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान श्रद्धाच्या जागी आता या शोमध्ये भूमी पेडणेकरला आमंत्रण दिल्याचे समोर आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)