23 कोटींच्या कामांना मंजुरी

– स्थायी समितीची बैठक : “त्या’ बचतगटांना 25 हजार रुपये

पिंपरी – शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 23 कोटी 3 लाख 66 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दहा वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचत गटांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

स्थायी समिती सभागृहात बुधवारी (दि.23)झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील रावेत सी.डी.वर्क पासुन ते वाल्हेकरवाडी चौकापर्यंत 34.5 मी रूंदीचा रस्ता विकसीत करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 14 कोटी 1 लाख 17 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. संत तुकारामनगरमधील अत्रे प्रेक्षागृह नुतनीकरणाचे काम चालु आहे.

याठिकाणच्या वातानुकुलन यंत्रणेसाठी सुमारे 2 लाख 12 हजार रुपये, मिळकत कर वसुली जनजागृती मोहिमेअंतर्गत विविध रेडीओ स्टेशनवरून मिळकत कर भरण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे त्या साठी 9 लाख 34 हजार रुपये, मोरवाडी व कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीसाठी बेंचेस साहित्य खरेदी करण्यासाठी 12 लाख 67 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

पाणी पुरवठा विभागाकडील काही कामांवर तरतूदी करणे राहून गेलेअसुन, त्यासाठी 1 कोटी 73 लाख 5 हजार रुपये खर्चास, तसेच नवीन प्रभाग रचनेमुळे काही कामांच्या समावेश इतर प्रभागांमध्ये झालेली आहे. त्यापोटी 29 लाख 95 हजार रुपये खर्चास, त्याचबरोबर दहा वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचत गटांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये प्रमाणे एकूण 13 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)