2,245 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

चिंचवड : संस्कार प्रतिष्ठान व टाटा व्हॉलेंटिअरिंग टाटा मोटर्स यांच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी भक्ती-शक्ती निगडी येथे संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा व्हॉलेंटिअरिंग टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन टाटा मोटर्सचे समाज विकास प्रमुख अचिंत्य सिंग व मयुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यामध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, पायदुखी, मानदुखी, डोळे, कान, नाक, घसा, दात व पोटाचे विकार याची तपासणी करुन औषधे देण्यात आली.

सुमारे 2 हजार 245 वारकऱ्यांना याचा लाभ मिळाला. टाटा मोटर्सचे डॉ. शरद जगमवार, डॉ अरविंद वाघचौरे, डॉ. मृणाल फोंडेकर, डॉ. निखील राक्षे, डॉ. नीरज पाटील, डॉ. कोमल कदम, डॉ. प्रिया नायर यांनी तपासणी केली. 700 वारकऱ्यांच्या हाता-पायांची मसाज करण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या शिबिराला भेट दिली. 130 स्वयंसेवक विशेष पोलीस अधिकारी म्हणून देहू ते पिंपरी असे दोन दिवस भर पावसात निगडी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदोबस्त व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)