220 नागरीक व 270 विद्यार्थ्यांची कार्ल्यात नेत्र तपासणी

कार्ला- येथे जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात श्री जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था व व्हिजन स्पिरिंगने तीन दिवस मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित केले होते. कार्ला व परिसरातील 220 नागरिकांनी डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी श्री एकवीरा माध्यमिक विद्यालयातील व लाजवंती हंसराज गुप्ता कनिष्ठ महाविद्यालयातील 270 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी झाली. आवश्‍यकतेनुसार नागरीकांना व विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. माजी सभापती शरदराव हुलावळे, कार्लाच्या सरपंच अश्विनीताई हुलावळे, उप सरपंच संजय हुलावळे, कार्ला महिला आघाडी संघटक सुरेखाताई हुलावळे यावेळी उपस्थित होते. कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पोळ, डॉ. चव्हाण, संदिप हुलावळे, गणेश हुलावळे, नितीन देशमुख, आदित्य हुलावळे, अमोल इंगवले, विनोद हुलावळे, आरोग्य कर्मचारी व विद्यालयातील शिक्षक यांनीही सहकार्य केले. युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल भाऊसाहेब हुलावळे यांनी आयोजन केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)