सीरियन फौजांच्या हल्ल्यात इडलिब प्रांतात 22 ठार 

बैरूत – सीरीयन सरकारच्या फौजांनी इडलिब प्रांतात बंडखोर गनिमांच्या अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले. त्यात एकूण 22 जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या भागात शस्त्रसंधी पाळण्याचा करार बंडखोर आणि सरकारी फौजांमध्ये झाला आहे. त्यानंतर तेथे झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच मोठा हल्ला आहे.

इडलिब आणि हमा प्रांतातील जैश अल इझ्झा गटाच्या गनिमांशी सरकारी फौजांची मोठी चकमक झाली. सीरियातील हाच भाग सध्या बंडखोरांच्या ताब्यात आहे. अन्य प्रांतावर सरकारी फौजांनी कब्जा करून तेथील बंडखोर गनिमांना त्यांनी हुसकाऊन लावले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीरियात सन 2011 साली यादवी युद्ध सुरू झाले. त्यानंतर इस्लामिक स्टेट आणि त्यांच्या अन्य छोट्या संघटनांनी शस्त्रांच्या बळावर सीरियातील अनेक भागावर कब्जा केला होता. तथापी सीरियन सरकारच्या फौजांनी रशियाच्या मदतीने या बंडखोरांवर अनेक ठिकाणी मात करून हे प्रांत मोकळे केले आहेत. तथापी अजूनही काही भागांवर बंडखोरांचा कब्जा आहे. पण टप्प्याटप्याने तेही प्रांत बंडखोरांच्या तावडीतून मोकळे करण्याचा प्रयत्न सीरियन सरकारकडून सुरू आहे. त्यातूनच इडलिब व शेजारच्या प्रांतात सरकारी फौजांनी हे हल्ले नव्याने सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)