चीन मधील रासायनिक फॅक्‍टरीतील स्फोटात 22 ठार

संग्रहित छायाचित्र

बिजींग: उत्तर चीन मधील एका रासायनिक फॅक्‍टरीत झालेल्या भीषण स्फोटात 22 जण ठार झाले तर अन्य 22 जण जखमी झाले आहेत. हेबेई शेंगुआ केमिकल कंपनीच्या फॅक्‍टरीत हा स्फोट झाला. ही फॅक्‍टरी बिजींग पासून दोनशे किमी अंतरावर असलेल्या झांगजीयाकोऊ येथे आहे.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला आज ही घटना घडली. घटनास्थळी मोठी मदत यंत्रणा पाठवण्यात आली आहे. स्फोटामुळे फॅक्‍टीच्या परिसरात मोठी आग लागली. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाहीं. फॅक्‍टरीत करण्यात आलेला मोठा रसायन साठा त्यात भस्मसात झाल्याचे सांगण्यात येते. कंपनीच्या आवारात असलेली जवळपास सर्वच वाहनेही यात जळून खाक झाल्याचे दृष्य घटनास्थळी दिसत होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)