218 जणांना डेंग्यूची बाधा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराने नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे 218 “पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चार महिन्यापासून शहरवासियांना “स्वाईन फ्लू’ने त्रस्त केले होते. मागील महिन्यापासून “स्वाईन फ्लू’ आजार आटोक्‍यात आला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूने कहर केला आहे. नोव्हेंबर महिन्यात बदलणाऱ्या वातावरणामुळे 4 हजार 570 तापाचे रुग्ण आढळले आहेत, यामध्ये, डेंग्यूच्या 859 संशयित रुग्णापैकी 218 “पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरुन दिसून येते. तसेच, ऑक्‍टोबर महिन्यात 105 रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचा नोव्हेंबर महिन्यात एक “पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला आहे. या वर्षी नोव्हेंबर महिनाअखेर डेंग्यूचे 426 रुग्ण तर मलेरियाचे 26 रुग्ण आढळले आहेत.

पावसाळा संपल्यानंतरही शहरातील काही भागात कचरा, तुंबलेली गटारे, सतत वाहनारी सांडपाणी यामुळे किटकजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील वीस दिवसात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ऑक्‍टोंबर व नोव्हेंबर महिन्यातील डेंग्यूची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत आहे. डेंग्यूने नोव्हेंबर महिन्यात वर्षभरातील सर्वांत जास्त रुग्णांचा आकडा आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून नियमित धूर फवारणी व औषध फवारणी होत नसल्याने किटकजन्य आजारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

दक्षतेचे महापालिकेचे आवाहन
आपल्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी नागरिकांनी घेणे आवश्‍यक आहे. सोसायटी, बैठ्या घरांच्या आवारातील कुंड्या, टायर, भांडी यासारख्या वस्तूंमध्ये पाणी साचून देऊ नका. तसेच, झोपताना मच्छदाणीचा वापर करावा. डेंगीच्या आजारावर प्रतिजैविक लस उपलब्ध होत नसल्याने या आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांकडून त्वरीत उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. तसेच, या आजाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)