लोकसभेत गोंधळ घालणारे 21 सदस्य निलंबित

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: लोकसभेमध्ये विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी आज आणखी 21 सदस्यांना सभागृहातून निलंबित केले. अद्रमुक आणि तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी तरीही गोंधळ घालणे सुरुच ठेवले. त्यामुळे सभापती सुमित्रा महाजन यांना या दोन्ही पक्षांच्या 21 सदस्यांना निलंबित केले. यामध्ये तेलगू देसम पार्टीचे 13 आणि अद्रमुकच्या 7 सदस्यांचा समावेश आहे. कालच अद्रमुकच्या 24 सदस्यांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते.

आज दिवसभराचे कामकाज सुरु होताच अद्रमुक आणि टीडीपीच्या सदस्यांनी मोकळ्या जागेमध्ये एकत्र येऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. कावेरी नदीवरील धरणाचे बांधकाम थांबवावे आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा यासाठी या दोन्ही पक्षांनी घोषणा आणि फलकही फडकावले. अद्रमुकच्या सदस्यांनी सभापतींच्या दिशेने कागदही भिरकावले. याच गोंधळात संसदीय कामकाज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या सदस्यांना आपापल्या जागेवर बसण्याचे आवाहन केले.

मात्र या सदस्यांनी आपला गोंधळ कायमच ठेवला. त्यावर सभापती सुमित्रा महाजन कारवाईचा इशारा दिला. त्यानंतरही गोंधळ सुरुच राहिल्याने सभापतींनी टीडीपीच्या 12 आणि अद्रमुकच्या 7 सदस्यांना निलंबित केले.
दुपारी कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर अद्रमुक आणि टीडीपीच्या सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर टीडीपीच्या दोघा सदस्यांना निलंबित करण्यात आले. लोकसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या एकूण 45 सदस्यांना सभापती सुमित्रा महाजन यांनी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)