21 हजार भारतीयांचे व्हिसा मुदत संपुनही अमेरिकेत वास्तव्य

वॉशिंग्टन – अमेरिकेचा अधिकृत व्हीसा घेऊन भारतातून जे नागरीक अमेरिकेत आले आहेत. त्यातील 21 हजार नागरीकांच्या व्हीसाची मुदत संपूनही ते अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्याला आहेत असे होमलॅंड सिक्‍युरिटीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

तथापी अन्य देशांतील नागरीकांच्या तुलनेत भारतीयांचे हे प्रमाण कमी आहे. अमेरिकेत एकूण 7 लाख 1 हजार 900 विदेशी नागरीक व्हिसाची मुदत संपूनही तेथे बेकायदेशीरपणे वास्तव्याला आहेत. ही सप्टेंबर 2017 पर्यंतची आकडेवारी आहे. या अहवालात नमूद करण्यात आले आहे की सन 2017 मध्ये बी-1 किंवा बी-2 पद्धतीचा व्हिसा मिळवून एकूण 10 लाख 70 हजार भारतीय नागरीक अमेरिकेत आले आहेत. त्यातील 14 हजार 202 भारतीयांच्या व्हिसाची मुदत संपूनही ते येथेच राहात आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यातील 1708 लोकांनी अमेरिका सोडून मायदेशी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला पण अद्याप 12498 भारतीय नागरीकांचे कोणतेही रेकॉर्ड होमलॅंड सिक्‍युरिटीकडे उपलब्ध नाहीं.

सन 2017 मध्ये एकूण 1 लाख 27 हजार 435 विद्यार्थि शिक्षणासाठी किंवा संशोधनाच्या कामासाठी अमेरिकेत आले. त्यापैकी 4400 विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपूनही ते येथेच राहात आहेत. त्यांना नोटीसा जारी करण्यात आल्यानंतर त्यापैकी 1567 जणांनी अमेरिका सोडली पण अजून 2833 विद्यार्थी तेथे तसेच राहात आहेत असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)