21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता ; 66 पदकांसह भारत तिसऱ्या स्थानी

सिडनी : दिमाखदार सोहळ्याने ऑस्ट्रेलियात आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची आज सांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 66 पदकं आपल्या खात्यात जमा केली. या पदकांसह भारत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण, 59 रौप्य आणि 59 कांस्य पदकांची कमाई केली. त्या खालोखाल इंग्लंडने 45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर भारताच्या खात्यात 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 71 देशांनी सहभाग घेतला होता. यातील 43 देशांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्ण पदाकाच्या कमाईत भारताने कॅनेडालाही मागे टाकले. कॅनेडाने यंदा 15 सुवर्ण पदकांची कमाई केली. तर भारताच्या खात्यात एकूण 26 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. 2010 मधील 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडे यजमान पद असताना, 101 पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं होतं. यात एकूण 38 सुवर्ण पदकांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)