गोल्ड कोस्ट – 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची आज सांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 66 पदकं आपल्या खात्यात जमा केली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 71 देशांनी सहभाग घेतला होता. यातील 43 देशांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्ण पदकाच्या कमाईत भारताने कॅनेडालाही मागे टाकलं. कॅनेडाने यंदा 15 सुवर्ण पदकांची कमाई केली. तर भारताच्या खात्यात एकूण 26 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. 

स्पर्धेत भारताची कामगिरी आणि पदक विजेत्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :- 
बॅडमिंटन (महिला एकेरी) सायना नेहवा सुवर्ण, बॅडमिंटन (महिला एकेरी) पी.व्ही.सिंधू रौप्य, बॅडमिंटन (पुरुष एकेरी) किदांबी श्रीकांत रौप्य, बॉक्‍सिंग (महिला 48 किलो वजनी गट) मेरी कोम सुवर्ण, कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 65 किलो वजनी गट) बजरंग पुनिया सुवर्ण, कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) पूजा धांडा रौप्य, कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 68 किलो वजनी गट) दिव्या काकरन कांस्य, बॉक्‍सिंग (पुरुष 91 किलो वजनी गट) नमन तन्वर कांस्य, नेमबाजी (पुरुष 25 मीटर रॅपीड पिस्टल) अनिश भानवाला सुवर्ण, नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) अंजुम मोदगिल रौप्य, नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) तेजस्विनी सावंत सुवर्ण, थाळीफेक – सीमा पुनिया रौप्य, थाळीफेक – नवजीत धिल्लन कांस्य, कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 74 किलो वजनी गट) सुशीलकुमार सुवर्ण, कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 76 किलो वजनी गट) किरण कांस्य, कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) राहुल आवारे सुवर्ण, कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 53 किलो वजनी गट) बबिता फोगट रौप्य, नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल प्रोन) तेजस्विनी सावंत रौप्य, नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य, नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण, नेमबाजी (पुरुष – 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य, पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य, नेमबाजी (महिला – 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण, बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण, टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण, नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य, नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य, नेमबाजी (पुरुष – 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण, नेमबाजी (पुरुष – 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य, वेटलिफ्टिंग (पुरुष – 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य, टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण, नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण, नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य, नेमबाजी (पुरुष – 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य, वेटलिफ्टिंग (पुरुष – 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य, वेटलिफ्टिंग (महिला – 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण, वेटलिफ्टिंग (पुरुष – 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण, वेटलिफ्टिंग (पुरुष – 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण, वेटलिफ्टिंग (महिला – 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण, वेटलिफ्टिंग (महिला – 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण, वेटलिफ्टिंग (पुरुष – 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य, वेटलिफ्टिंग (पुरुष – 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)