21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता, 66 पदकांसह भारत तिसऱ्या स्थानी 

गोल्ड कोस्ट – दिमाखदार सोहळ्याने ऑस्ट्रेलियात आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची आज सांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 66 पदकं आपल्या खात्यात जमा केली. या पदकांसह भारत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 66 पदकांची लयलुट करत भारताने शानदार कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरले आणि पदकांची लयलूट केली. बॉक्‍सिंग, नेमबाजी, भालाफेक, कुस्ती आणि टेबल टेनिस यासारख्या खेळांत भारताने पदकांची ‘सिल्व्हर ज्युबिली’ पार केली. 

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आतापर्यंत 26 सुवर्ण, 20 रौप्य व 20 कांस्य पदकांची कमाई केली. एकूण 66 पदकासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर भारत पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. 2014 मध्ये ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये भारताने 64 पदके जिंकली होती. त्या तुलनेत भारताची कामगीरी चांगली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने 101 पदके जिंकली होती. 2002 मध्ये मॅनचेस्टरमध्ये 69 पदके जिंकली होती. स्पर्धेत 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदकं भारताने जिंकली. 2014ला ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने 64 पदकांची कमाई केली होती. यंदा त्यापेक्षा उत्तम कामगिरी भारताने केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे.
भारतासाठी नेमबाजीचा इव्हेंट खुपच चांगला राहिला. नेमबाजीत यावेळी भारतीय नेमबाजांनी 7 सुवर्ण पदकांसह 16 पदके कमावली. अनिश भानवाला, मेहुली घोष आणि मनू भाकर यांसारख्या तरुण नेमबाजांशिवाय हिना सिद्धू, जितू राय आणि तेजस्विनी सावंत यांसारख्य अनुभवी नेमबाजांनीही भारतासाठी पदके जिंकली. मात्र, गगन नारंगसाठी यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा खास राहिली नाही.

वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एकूण 9 पदके कमावली. यामध्ये 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश होता. मीराबाई चानू, संजीता चानू यांनी भारताला सुवर्ण पदके मिळवून दिली. त्याशिवाय पूनम यादवने देखील भारतासाठी सुवर्ण जिंकले. बॉक्‍सिंगमध्ये भारताने एकूण 9 पदके पटकावली. यामध्ये 3 सुवर्ण, 3 रौप्य तर 3 कांस्य पदके जिंकली. यामध्ये मेरी कोमने सुवर्ण जिंकून दाखवले की, वय आपल्यातील प्रतिभेला रोखू शकत नाही.
बॅडमिंटनमध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली. भारताने मिश्र प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. तसेच महिला एकेरीमध्ये सायना नेहवालने भारताच्याच पी. व्ही. सिंधूला हारवत सुवर्ण आपल्या नावावर नोंदवले. तर पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांला अंतिम फेरीत ऑलंपिक रौप्य पदक विजेता मलेशियाचा खेळाडू के. ली. चेंग वेई ने धोबीपछाड दिली. त्याचबरोबर टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला आणि पुरुषांच्या संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. त्याचबरोबर महिलांच्या एकेरीमध्ये मणिका बत्राने सुवर्ण जिंकले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)