21 वर्षांनी संजय माधुरी पडद्यावर एकत्र

बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षित आणि संजय दत्तच्या रोमान्सचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. एकेकाळी “लव्ह पेअर’ बनलेली ही जोडी गेल्या दशकभरापासून एकमेकांशी अगदी अनोळखी असल्याप्रमाणे रहात होती. इतके की हे दोघेजण एकमेकांचे नाव देखील घेत नसत. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला एका इव्हेंटमध्ये माधुरी दीक्षितबाबत प्रश्‍न विचारला गेला होता. तेंव्हा रागावून तो तिथून ताडकन निघून गेला होता. “साजन’ आणि “खलनायक’सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलेल्या संजय दत्त आणि माधुरीला आता 21 वर्षांनी पुन्हा पडद्यावर एकत्र बघण्याची संधी मिळणार आहे. त्या सिनेमाबाबतच त्याला प्रश्‍न विचारला गेला होता.

हे दोघेजण करण जोहरच्या “शिद्दत’ या सिनेमात एकत्र येणार आहेत. खरे तर या सिनेमामध्ये श्रीदेवी छोटीशी भूमिका साकारणार होती. पण तिच्या अकाली निधनामुळे तिचा रोल माधुरी करणार आहे. संजय दत्त पहिल्यापासून या सिनेमामध्ये होताच. मात्र जेंव्हा श्रीदेवीच्या जागेवर माधुरीला घेतले जाणार असे समजल्यावर संजय दत्तने हा सिनेमाच सोडून द्यायचा विचार केला होता. पण करण जोहरने त्याची समजूत काढली.

-Ads-

श्रीदेवीच्या जागेवर काम करण्याची तयारी दर्शवल्याबद्दल जान्हवी कपूरनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माधुरीचे आभार मानले होते. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. सुरुवातील या चित्रपटाचं नाव “शिद्दत’ असल्याचं वृत्त होते. पण नंतर करण जोहरने ट्‌विट करत नाव अद्याप ठरले नसल्याचं स्पष्ट केले आहे.

माधुरी आणि संजय दत्तने 1997 साली “महानता’ या अखेरच्या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यापूर्वी सुमारे दशकभर त्यांच्या अफेअरचे किस्से रंगवून रंगवून सांगितले जायचे. हे दोघे लग्न करणार असल्याचेही बोलले जायला लागले होते. मात्र 1993 साली मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक झाली आणि या अफेअरला पूर्णविराम मिळाला. त्यांचा “महानता’ रिलीज झाला पण त्यांच्या स्टोरीची महानता मात्र समाप्त झाली होती. आता त्याची ओझरती झलक बघायला मिळेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)