21 ते 27 जून दरम्यान सप्तशृंगी देवीचे दर्शन बंद

नाशिक, दि. 20 – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीचे दर्शन 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडावरील भगवती मंदिराच्या शिखरावर दरड काढण्याचे काम 21 ते 27 जून दरम्यान सुरू राहाणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी देवीचे दर्शन सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कार्यकारी अभियंता सुरज कंकरेजा व उपअभियंता केदारे यांनी दिली आहे.

सप्तशृंगी गडावर भगवती मंदिर परिसरात व उतरत्या पायऱ्यांच्या बाजूला 12 जून रोजी दरड कोसळण्याची घटना घडली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्यासंरक्षक जाळ्यांमध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला होता. त्यामुळे त्या दरड काढण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)